कोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या (Coronavirus) नव्या आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. आज नवे ३०८१ रुग्ण आढळलेत व २,३४२ झाले बरे झालेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात सध्या ५२,६५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात आज ३,०८१ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. ५० जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण १८,८६,४६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण ५२,६५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात आढळले २७३ रुग्ण, तिघांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात २७३ रुग्ण आढळले. तीन रुग्णांचा मृत्यू झाला. ३४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज दिवस अखेर एकूण १, ७५, ९७३ रुग्ण बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १२३ नवे रुग्ण आढळलेत. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER