कोरोना : आज आढळलेत नवे ३१ हजार ५३५ रुग्ण, एकूण आकडा २५ लाख ६४ हजार ८८१

Coronavirus Maharashtra

मुंबई : कोरोनामुळे (Corona) राज्यात गेल्या वर्षी देशात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्याला आज एक वर्ष झाले. मात्र, अजूनही करोनाची साथ होती तशीच आहे. गेल्या २४ तासात राज्यात ३१ हजार ५३५ नवे रुग्ण आढळले आहेत व एकूण आकडा २५ लाख ६४ हजार ८८१ झाला आहे. यापैकी २ लाख ४७ हजार २९९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांवरून हळूहळू घसरत ८८.२१ टक्क्यांपर्यंत उतरला आहे.

रुग्णांच्या मृत्यूचा रोज वाढणारा आकडा राज्यासाठी चिंतेची बाब ठरला आहे. २३ मार्च रोजी राज्यात १३२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज हा आकडा खाली आला असला, तरी दिवसभरात ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत ५ हजार १८५ तर पुण्यात ३ हजार ५०९ नवे रुग्ण
राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यात मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. मुंबईत आज दिवसभरात ५ हजार १८५ नवे रुग्ण सापडले. तर पुण्यात हा आकडा ३ हजार ५०९ च्या घरात आहे. मृतांचा आकडा मुंबईपेक्षाही पुण्यात जास्त आहे. पुण्यात आज दिवसभरात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा वाढून ५ हजार ११४ पर्यंत गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER