कोरोना : राज्यात आज ३ हजार ६९४ रुग्ण झालेत बरे; रिकव्हरी रेट ९५.२२ टक्के

Corona Virus

मुंबई : राज्यातील करोनाची साथ अजूनही सुरु असली तरी रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही दररोज मोठी भर पडते आहे. आज दिवसभरात ३ हजार ६९४ रुग्ण बरे झालेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२२ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १० हजार ५२१ रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या २४ तासात राज्यात ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २० लाख ६ हजार ३५४ वर पोहचली आहे. ४३ हजार ८७० अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, ५० हजार ७४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४१,४५,८२९ नमुन्यांपैकी २० लाख ६ हजार ३५४ (१४.१८टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळलेत.सध्या राज्यात २ लाख १३ हजार ६७८ जण गृहविलगीकरणात असून, १ हजार ९९३ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER