कोरोना : आज राज्यात आढळलेत २८५४ नवे रुग्ण; ६० चा मृत्यू

Corona Outbreak in Kolhapur

मुंबई :- राज्यात करोनाच्या (Corona) रुग्णांची आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या रोज वाढते आहे. आज दिवसभरात २८५४ नवे रुग्ण आढळलेत; ६० रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, १५२६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १९ लाख १६ हजार २३६ वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.३४ टक्के आहे. राज्यात सध्या ५८ हजार ९१ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १८ लाख ७ हजार ८२४ रुग बरे झाले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२४,५१,९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख १६ हजार २३६ (१५.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ६४ हजार १२१ व्यक्ती होम क्वारंटाइन तर ३ हजार ७०४ संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER