कोरोना : राज्यात दिवसभरात आढळलेत २,७५२ नवे रुग्ण, ४५ चा मृत्यू

Coronavirus

मुंबई : राज्यात आज कोरोनाचे नवे २,७५२ नवे रुग्ण आढळलेत, ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, १७४३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ९ हजार १०६ वर पोहचली आहे. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४४ हजार ८३१ असून, १९ लाख १२ हजार २६४ आतापर्यंत बरे झाले आहेत व ५० हजार ७८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावरील लस घेण्यात कुठलाही धोका नाही. कोविड प्रतिबंधक लशींची क्षमता व सुरक्षा चांगली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सेवकांशी संवाद कार्यक्रमात सांगितले. लसीबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER