कोरोना : आज आढळलेत २,६३० नवे रुग्ण

Corona Update

मुंबई : राज्यात दिवसभरात २,६३० नवे रुग्ण आदळले आहेत. १५,५३५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९५.२३ टक्के झाला आहे. दिवसभरात ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

राज्यातील रुग्णांची एकूणसंख्या २०,२३,८१४ वर पोहोचली आहे. एकूण १९,२७,३३५ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण ५१,०४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ४४,१९९ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध कोविड रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या १,९१,९७५ लोक होम तर २,३२४ जण संस्थात्मक क्वारंटीन आहेत.

पुणे

राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये पुणे प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर ठाण्याचा क्रमांक लागतो. पुण्यात सध्या १३,५०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ठाण्यात ७,६७७ आणि त्यानंतर मुंबईत ५,७६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER