कोरोना : राज्यात आज आढळलेत नवे २४९८ रुग्ण; ४००० पेक्षा जास्त झालेत बरे

Corona Updates

मुंबई : आज दिवसभरात २४९८ नवीन रुग्ण सापडले. ५० रुग्णांचा मृत्य झाला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर करोना बाधितांच्या संख्येत घट झाल्यानं मोठा दिलासा मिळतो आहे. (Coronavirus In Maharashtra Latest News Update)

गेल्या दोन दिवसांपासून करोना बाधितांची संख्या वाढत असताना आजची आकडेवारी थोडी दिलासा देणारी आहे. दिवसभरात २४९८ रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासात ४५०१ रुग्णांना सुटी मिळाली आहे. आतापर्यंत एकूण १८ लाख १४ हजार ४४९ करोना बाधित रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४. ४ टक्के झाले आहे.

दरम्यान, राज्यात ५० रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत करोना एकूण ४९३०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्णांचा मृत्यूदर २. ५७ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२५,४३,७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२२,०४८ (१५.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,५२,५३५ व्यक्ती होमक्वारंटाईन तर ३,१३८ संस्थात्मक क्वारंटाईन आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Check PDF :-प्रेस नोट २८ डिसेंबर २०२०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER