कोरोना : राज्यात २३ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद, बरे होण्याचे प्रमाण ७०.७१ टक्के

Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोनाचे २३ हजार ३६५ नवे रुग्ण आढळले. राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या ११ लाख २१ हजार २२१ झाली आहे. गेल्या २४ तासात ४७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण ३० हजार ८८३ आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

आज दिवसभरात १७ हजार ५५९ रुग्णांना सुट्टी मिळाली. आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.७१ टक्क्यांवर गेले आहे. मृत्यूदर २.७५ टक्के आहे. आतापर्यंत ५५ लाख ६ हजार २७६ चाचण्या करण्यात आल्या असून यातीळ ११ लाख २१ हजार २२१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. राज्यात सध्या १७ लाख ५३ हजार ३४७ संशयित रुग्ण होम क्वारंटाइन असून ३६ हजार ४६२ संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER