कोरोना : महाराष्ट्रात २०, २०६ रुग्णांना मिळाली सुटी; नवे १८, ३९०

Maharashtra Coronavirus

मुंबई :- महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे (Corona) १८ हजार ३९० नवे रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंतची राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या १२ लाख ४२ हजार ७७० झाली आहे. मागील २४ तासांमध्ये २० हजार २०६ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

सध्या महाराष्ट्रात २ लाख ७२ हजार ४१० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील चोवीस तासात ३९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात करोनाच्या ३३ हजार ४०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये २० हजार २०६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ७५.३६ टक्के आहे.

आजवर तपासण्यात आलेल्या ६० लाख १७ हजार २८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख ४२ ७७० ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ७० हजार २०० संशयित रुग्ण होम क्वारंटाइन असून ३४ हजार ९८२ संस्थात्मक क्वारंटाइन आहेत, असे आरोग्य खात्याने कळवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER