कोरोना : राज्यात आज आढळले १७ हजार ६६ नवे रुग्ण, एकूण संख्या १०,७७,३७४

Corona Patient

मुंबई : महाराष्ट्रात आज कोरोनाचे १७ हजार ६६ नवे रुग्ण आढळले. २५७ रुग्णांचा मृत्यू झाला. १५ हजार ७८९ रुग्ण बरे झालेत. राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहचली आहे. यात २ लाख ९१ हजार २५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या ७ लाख ५५ हजार ८५० रुग्णांचाही यात समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

आजपर्यंत राज्यात ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण बरे झाले असून, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के आहे. आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ५३ लाख २१ हजार ११६ नमून्यांपैकी १० लाख ७७ हजार ३७४ नमूने (२०.२ टक्के) पॉझिटिव्ह आढळलेत. सध्या राज्यात १७ लाख १२ हजार १६० संशयित रुग्ण होम क्वारंटाइन आहेत व ३७ हजार १९८ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत आज २ हजार २५६ नवे रुग्ण आढळले असून, ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७१ हजार ९४९ वर पोहचली असून यात ३१ हजार ६३ अॅक्टिव्ह आहेत. यात बरे झालेले १ लाख ३२ हजार ३४९ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८ हजार १७८ रुग्णांचा समावेश आहे. ही माहिती मुंबई महापालिकेने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER