कोरोना : राज्यात दिवसभरात आढळलेत नवे १६ हजार ६२० रुग्ण, ५० चा मृत्यू

Coronavirus

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग आता वेगाने वाढतो आहे. आज (रविवारी) दिवसभरात १६ हजार ६२० रुग्ण आढळले आहेत व ५० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील रुग्णांचा मृत्युदर २.२८ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८६१ रुग्णांचा मृत्यू झाला.

अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्यभरात निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. आज ८ हजार ८६१ रुग्ण बरे झालेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,३४,०७२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.२१ टक्के झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७५,१६,८८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,१४,४१३ (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८३,७१३ व्यक्ती गृह व ५,४९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सध्या १,२६,२३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER