कोरोना : राज्यात आज वाढलेत १५, ८१७ रुग्ण; ५६ चा मृत्यू

Corona Virus

मुंबई :- राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढतो आहे. आज राज्यात नवे १५, ८१७ रुग्ण आढळलेत. अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तर, काही ठिकाणी लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकाडाउन लागतो की काय, अशी चर्चा सुरू आहे.

आज दिवसभरात राज्यात १५, ८१७ नवीन रुग्ण वाढले व ५६ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील रुग्णांचा मृत्यू दर २.३१ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात ५२, ७२३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १,१०,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज ११,३४४ रुग्ण बरे झालेत. आजपर्यंत एकूण २१,१७,७४४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७३,१०,५८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,८२,१९१ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४२,६९३ व्यक्ती गृह तर ४ हजार ८८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER