कोरोना : राज्यात आढळलेत आज १५ हजार ५१ नवीन रुग्ण, ४८ चा मृत्यू

Coronavirus

मुंबई :- राज्यात दररोज मोठ्या संख्येत रुग्ण आढळत आहेत. आज (सोमवारी) दिवसभरात राज्यात १५ हजार ५१ नवे रुग्ण वाढले असून, ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचा राज्यातील मृत्युदर २.२७ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ९०९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज राज्यात १,३०,५४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

या स्थितीमुळे राज्य सरकार कोरोना (Corona) निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसा इशारा दिला आहे. आज १०,६७१ रुग्ण बरे झालेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,४४,७४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.०७ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ (१३.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती गृह आणि ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कठोर निर्णय घेण्यासंदर्भात संकेत दिले होते. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीदेखील निर्बंध कठोर करण्यासंदर्भात इशारा दिला. “वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. जनतेने नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन टोपेंनी केले. राज्याच्या काही भागांमध्ये सध्या अंशत: लॉकडाऊनची परिस्थिती असताना संपूर्ण राज्यासाठीच तशा प्रकारचे निर्बंध घातले जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER