कोरोना : राज्यात आज १२,१८२ रूग्ण झालेत बरे, ९,९२७ नवे

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यातील करोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आज ९,९२७ नवे रुग्ण आदळलेत तर १२,१८२ बरे झालेत. गेल्या दोन दिवसात बरे होणाऱ्यांची संख्या वाढते आहे, हे दिलासादायक आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण २०,८९,२९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.३४ टक्के आहे. राज्यात आज ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांचा मृत्यूदर २.३५ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७०,२२,३१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,३८,३९८ (१३.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात ४,५७,९६२ व्यक्ती गृहविलगीकरणात तर ३,८२७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज एकूण ९५,३२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत ५२,५५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER