झटपट बनवा ‘कोथिंबीर ढोकळा’..

कोथिंबीर ढोकळा

ढोकळा हा पदार्थ सर्वानी खाल्लाच असणार. पण मंडळी आज आपण हाच ढोकळा बनविणार आहोत. ते ही नव्या पद्धतीने. या ढोकळयाची विशेषतः म्हणजे यात आपण कोथिंबीरचा उपयोग करणार आहोत. म्हणून याला ‘कोथिंबीर ढोकळा’ ही म्हटले जाते. साध्या ढोकळयाला कोथिंबीरची चव लागताच हा ढोकळा आणखी स्वादिष्ट बनतो. या स्वादिष्ट कोथिंबीर ढोकळयाची कृती पटकन लिहून घ्या…

साहीत्य :- dhokla recipe

  • कोथिंबिर 2 वाट्या (धुवून बारीक चिरलेली)
  • डाळीचे पिठ 1वाटी
  • बारीक रवा 1/4 वाटी
  • मिठ चवीनुसार
  • मिरची-लसुण पेस्ट
  • हींग,तिळ,हळद
  • तेल एक टेबलस्पून
  • दही दोन टेस्पून
  • इनो फ्रुट साॅल्ट 3/4 टीस्पून
  • पाणी

कृती :- प्रथम कढईमध्ये तेल तापवून त्यात हींग,तिळ हळद घालून फोडणी करावी व त्यामधे चिरलेली कोथिंबिर टाकावी.थोडी परतून वाफवावी आणि गॅस बंद करावा. आता एका बाऊलमध्ये डाळीचे पिठ,रवा घ्यावे. त्यामधे मिरची-लसूण पेस्ट व मिठ घालावे.दही घालावे व पाणी घालून नीट मिक्स करावे. आता वर वाफवलेली कोथिंबीर घालावी व गरज वाटल्यास अजून थोडे पाणी घालून भजीच्या पिठा इतपत सैल मिश्रण तयार करावे. आता आधि ढोकळा स्टॅडच्या थाळीला तेलाचा हात लावून घ्यावा. कुकर मधे तळाला पाणी घालून गरम करण्यास ठेवा. नंतर सगळ्यात शेवटी तयार मिश्रणात इनो पावडर घालून एकाच दिशेने हलवून मिक्स करावे व झटपट थाळीत ओतावे आणि शिट्टी न लावता पंधरा मिनिट वाफण्यास ठेवावे. थंड झाल्यावर सुरीने वड्या कापाव्यात व खाण्यास द्यावे.