धणे – अनेक व्याधींना हरण करणारे !

Coriander

कोथिंबीर असो वा धणे कोणत्याही तिखट पदार्थाचा अविभाज्य भाग. प्रत्येक गृहीणी स्वयंपाक करतांना पदार्थ सजावटीकरीता चव वाढविण्याकरीता हिरवी ताजी कोथिंबीर वापरत असते. मसाल्यामधे धणे किंवा धण्याची पावडर वापरली जाते. चव वाढविण्या व्यतिरीक्त अनेक औषधी गुण या वनस्पतीमधे दडले आहेत हे आपल्याला माहिती आहे का?

Coriander and Cilantro: Planting, Growing, and Harvesting Coriander and Cilantro | The Old Farmer's Almanacआयुर्वेदात धान्यक, कुस्तुम्बुरु (कुत्सितं रोगसमूहं तुम्बति अर्दयति इति – रोगसमूह दूर करणारे त्रिदोष हर), वितुन्नक (विगतं तुन्नं दु:खमस्मात् – ज्याच्या सेवनाने अनेक कष्ट दूर होतात) हृद्या वेषणा अशी वेगवेगळी पर्यायी नावे आली आहेत.

धणे, कोथिंबीर याचा आभ्यंतर बाह्य अशा दोन्ही प्रकारे औषध म्हणून प्रयोग होतो. कोथिंबीरीचा वाटून तयार केलेला लेप सूज कमी करणारा आहे.

 • पिंपल्सकरीता धण्याचा वापर लेप स्वरूपात विविध औषधांसह केला जातो.
 • डोक दुखत असेल तर कोथिंबीर वाटून त्याचा लेप लावल्यास डोकेदुखी थांबते.
 • मुखपाक, छाले झाले असतील तर कोथिंबीर रस काढून त्याने गुळण्या केल्यास आराम पडतो.
 • घोळणा फुटणे, नाकातून रक्त पडत असल्यास हा रस टाकल्यास फायदा होतो.
 • उष्णतेमुळे, पित्त वाढल्याने वारंवार तहान लागत असेल तर पाण्यात धणे उकळवून थंड झालेले पाणी घ्यावे.
 • तापेमधे उकळलेल्या पाण्यात १ चमचा धणे घालून ते थंड होऊ द्यावे व असे पाणी वारंवार प्यावे.
 • धणे मूत्रवह संस्थानवर कार्य करते. अडखळत लघवी होणे, उन्हाळी लागणे, उष्ण मूत्र प्रवृत्ती होणे, लघवीत आग होणे
 • अशा तक्रारींवर धण्याचे पाणी, काढा साखर घालून घेतल्यास उपशय मिळतो.
 • तापात तहान लागणे, शिरःशूल, दाह अशी लक्षणे असल्यास धण्याचा काढा फायदेशीर ठरतो.
 • अजीर्ण, वायुमुळे पोट फुगणे, पोटशूळ अशा तक्रारींवर धणे जिऱ्याचा काढा अन्नाचे पाचन करून या तक्रारी दूर करतो.
 • मळमळ वांती होत असल्यास धणे चूर्ण साखर एकत्र करून तांदळाच्या धुवणासह घ्यावे.
 • डोळ्याला सूज दाह लाली स्त्राव अशी लक्षणे असल्यास धण्याच्या चूर्णांची पोटली बनवून पाण्यात भिजवून डोळ्यांवर वारंवार फिरवावी.

तसे पाहता धणे हे काही मुख्य औषध नाही इतर औषधांसह संयोगाने ते अनेक रोगांमधे कार्य करते.

आयुर्वेदात (Ayurveda) धान्यकादि हिम, धान्यपंचक काढा यात धणे प्रमुख घटक द्रव्य आहे. विविध औषधी कल्पांमधे धण्याचा वापर करून कास नेत्र ज्वर मूत्र रोग चिकित्सा केल्या जाते.

ह्या बातम्या पण वाचा 

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER