प्रवाळ – आभूषण व औषधोपयोगी !

Coral

प्रवाळ किंवा पोवळे coral आपण अनेक वेळ बघितले असेल. रत्न म्हणून याचा वापर करण्यात येतो. ग्रहांचा खडा म्हणून पोवळ्याची अंगठी माळ घालण्यास सांगितली जाते. पोवळे दिसायला अतिशय सुंदर रत्न आहे. समुद्रात तळाशी सापडणारे हे प्रवाळ प्राण्याचे शव असते. कालांतराने ते कठीण व लाल होत जाते. समुद्रात बऱ्याच ठिकाणी पोवळ्याचे अगदी पहाड सुद्धा बनलेले असतात. प्रवाळात कॅल्शियम कार्बोनेट भरपूर प्रमाणात असते. प्रवाळ आभूषण किंवा ग्रहाचा खडा म्हणून वापरण्यात येत असला तरी हे प्रवाळ किंवा coral औषध म्हणूनही खूप उपयुक्त असते. अनेक औषधी कल्पात या प्रवाळाचा उपयोग केला जातो.

आयुर्वेदाची (Ayurveda) ही खूप मोठी विशेषता आहे. केवळ वनस्पती नाही तर प्राणीज द्रव्य औषध म्हणून कसे वापरायचे त्याचे गुण काय हे देखील वर्णित आहे. किती संपन्न शास्त्र आहे बघा आयुर्वेद. अजूनही प्रवाळ बेट प्रवाळ यावर संशोधन सुरु आहे आणि हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या आयुर्वेदात मात्र समुद्राच्या तळाशी सापडणारे हे प्राणीज द्रव्य, त्याचा उपयोग कसा करायचा कोणते प्रवाळ औषधी उपयोगार्थ वापरायचे, खरे प्रवाळ कसे ओळखायचे याबद्दल विस्तृत विवेचन मिळते. कसोटीच्या दगडावर घासल्यावरही ज्याचा रंग बदलत नाही ते श्रेष्ठ व ग्राह्य प्रवाळ मानले जाते.

प्रवाळाचे शुद्धीकरण केल्यानंतरच त्याचा औषधी स्वरूपात वापरता होतो. शास्त्रोक्त पद्धतीने प्रवाळ शोधन मारण करणे आवश्यक ठरते. प्रवाळभस्म, प्रवाळ पिष्टी, प्रवाळपंचामृत असे कल्प प्रवाळापासून बनविण्यात येतात. आजकाल प्रवाळ मिश्रित गुलकंद सुद्धा बाजारात मिळते.

प्रवाळ अम्लतानाशक, अम्लपित्त – रक्तार्श नाशक आहे. शरीरातील उष्णता कमी करणारे, रक्तविकार, दाहशमन करणारे आहे. यात प्राकृतिक कॅल्शियम जास्त असते. त्यामुळे हाडांना मजबूत करणारे आहे. अनेक त्रिदोष विकारांमधे या प्रवाळाचा युक्तीने वैद्यवर्ग वापर करत असतो. असे हे रत्न; आभूषण, औषध असे दोन्हीकरीता अतिशय उपयोगी आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button