दीपिकाच्या जाहिरातीसाठी हॉलिवूडच्या सिनेमाची कॉपी

Deepika Padukone

बॉलिवूडमध्ये (Bollywood News) ओरिजनल काम फार कमी वेळा आढळते. मग ती सिनेमाची कथा असो, पटकथा असो, काही गाजलेले सीन असो, संगीत असो वा डांसच्या मूव्ज असोत. त्या कुठून ना कुठून तरी चोरलेल्या असतात. सुरुवातीला इंटरनेटचे जाळे पसरलेले नसल्याने अशा चोऱ्या पकडल्या जात नव्हत्या. मात्र अशा चोऱ्या लगेचच पकडल्या जाऊ लागल्या आहेत. अशा चोऱ्या सर्रास होत असातना बॉलिवूडच्या तथाकथित क्रिएटिव्ह लोकांच्या क्रिएटिव्हिटी संपल्या की काय असा प्रश्न उभा करणारी घटना आता घडली आहे. याचे कारण म्हणजे दीपिकाची (Deepika Padukone) नवी जाहिरात. याचा अर्थ आता जाहिरातींसाठी कंटेंटही चोरू जाऊ लागला आहे.

दीपिका पदुकोणची एक जाहिरात नुकतीच रिलीज झाली आहे. ही एका जीन्सच्या ब्रॅन्डची जाहिरात आहे. गेल्या काही दिवसांपासून ही अ‌ॅड सुरु झाली आहे. पण आता या जाहिरातीवर हॉलिवूडमधील ‘Yeh Ballet’ सिनेमाची दिग्दर्शिका सोनी तारपोरवालाने कॉन्सेप्ट चोरी करण्याचा आरोप लावला आहे. सोनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्राम वर दीपिकाची जाहिरात बनवणाऱ्या जाहिरात कंपनीला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. यासाठी सोनीने एक भलीमोठी पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर सोनीने या पोस्टसोबत तिच्या सिनेमाच्या सेटचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोतून दीपिकाची जाहिरात कॉपी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. सोनीने एक फोटो दीपिकासोबतही शेअर केला आहे.

फोटो शेअर करीत सोनी तारापोरवाला ने लिहिले आहे, ‘काही दिवसांपूर्वी मला ही जाहिरात दाखवण्यात आली. जाहिरात पाहिल्यानंतर मला शॉकच बसला. कारण या जाहिरातीत माझ्या Yeh Ballet डांस स्टूडियोचा सेट वापरण्यात आल्याचे दिसत होते. माझ्या या सेटचे कॉन्सेप्चुलायजेशन आणि क्रिएशन शैलजा शर्माने केले होते. आमचे शूटिंग झाल्यानंतर आम्ही तो सेट तोडून टाकला होता. दीपिकाची जाहिरात बनवणाऱ्या दिग्दर्शकाने आमचा Yeh Ballet पाहिला आणि आमच्या सेटची कॉपी केली. कॉपी करण्यापूर्वी याची परवानगी घेणे जाहिरात बनवणाऱ्या कंपनीने आवश्यक होते. पण त्यांनी आम्हाला याची कल्पनाही दिली नाही. त्यांच्या क्रिएटिव्ह कामासोबत असे केले तर त्यांना चालेल का असा प्रश्नही सोनीने या पोस्टमध्ये केला आहे.

ही एक चोरी असून आमच्या डिझायनरवर हा अन्याय आहे. तिने तयार केलेला सेट कोणीतरी दुसऱ्याने कॉपी केला हे पाहून तिला काय वाटत असेल? भारतात सुरु असलेले कॉपीकॅट कल्चर आता बंद केले पाहिजे. भारतियांनी कॉपी करणे बंद केले तर सगळ्यांना कळेल की परदेशात त्यांच्यापेक्षा जास्त क्रिएटिव्हव लोक काम करीत आहेत असेही सोनीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘तांडव’ वादामुळे आमिरने बंद केली महाभारतावरील वेब सीरीज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER