दहिसर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू

Coronavirus - Maharashtra Police

मुंबई : दहिसर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू झाला. ५४ वर्षांचे हे कॉन्स्टेबल मधुमेहाचे रुग्ण होते व एक आठवड्यापासून सुट्टीवर होते. त्यांना कोरोनाची लागण होण्याचे निश्चित कारण अजून कळले नाही. आता कोरोनामुळे मृत्यूचा आकडा मुंबई पोलिसांबाबत २० झाला आहे.

२७ मे रोजी त्यांना ताप आला होता. त्यांच्या फॅमिली डॉक्टरने अँटिबायोटिक औषधें दिली. १ जूनला त्यांना श्वास घेण्यात त्रास झाल्याने बोरिवली (पश्चिम) येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले होते.

त्यांच्या रक्तातील ऑक्सिजन कमी झाले होते. त्यांना कोरोनाच्या रुग्णालयात हलवा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला पण, त्याचे कोरोना पॉझेटिव्हचे निदान झाले नसल्याने ते शक्य झाले नाही. वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्यावर कोरोना संशयित म्हणून उपचार सुरू केला. त्यांना ऑक्सिजन दिला. कोरोनाच्या चाचणीसाठी त्यांच्या ‘स्वाब’ घेण्यात आला. ४ जूनच्या संध्याकाळी त्यांचा कोरोना पॉझेटिव्ह रिपोर्ट आला. दरम्यान सकाळीच त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER