‘कुली नंबर वन’ला सगळ्यात कमी रेटिंग, सलमानच्या रेसलाही मागे टाकले

Coolie No. 1

1995 मध्ये प्रख्यात दिग्दर्शक डेव्हिड धवनने (David Dhawan) गोविंदासोबत कुली नंबर वन सिनेमा तयार केला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्याची गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. रिमेक बनवण्यात हुशार असलेल्या डेव्हिड धवनने या सिनेमाची रिमेक वरुण धवनला घेऊन केली पण ती फ्लॉप ठरल्याचे दिसत आहे. आयएमडीबीच्या रेटिंगमध्ये या सिनेमाला फक्त 1.3 रेटिंग (1.3 Rating)मिळाले आहे. यापूर्वी सलमान खानच्या रेस 3 ला 1.7 रेटिंग देण्यात आले होते. कुली नंबर वनने सलमानच्या या सिनेमाचा विक्रमही मोडला आहे. यामुळे अॅमेझॉन प्राईममध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. हा सिनेमा कसा घेण्यात आला याची अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

1990 च्या दशकात डेव्हिड धवन आणि गोविंदा ही बॉक्स ऑफिसवरची सुपरहिट जोडी होती. या जोडीनं ‘नंबर वन’ सीरीजमधील अनेक हिट सिनेमे दिले होते. यापैकीच एक होता ‘कुली नं. वन.’ हा सिनेमा सुपरहिट झाला होता. गोविंदा आणि करिश्मा कपूर असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. आपल्या मुलासाठी म्हणजे वरुण धवनसाठी डेव्हिडने कुली नं. वनची रिमेक करण्याचे ठरवलं. यासाठी त्याने निर्माता वासु भगनानीला तयार केले आणि वासु भगनानीही सिनेमाची निर्मिती करण्यास तयार झाला. वरुणसोबत नायिका म्हणून सारा अली खानला घेण्यात आले. सिनेमा तयार झाल्यानंतर तो थिएटरमध्येच रिलीज करण्याचा वासु भगनानी आणि डेव्हिड धवन यांचा विचार होता. परंतु अचानक हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमेझॉन प्राईममधील सूत्रांनी याबाबत बोलताना सांगितले की, पुढील महिन्यात एका मोठ्या स्टारची एक वेबसीरीज अमेझॉनवर रिलीज होणार आहे. या स्टारने कुली नंबर वन घ्यावा असा दबाव अमेझॉनच्या अधिकाऱ्यांवर टाकला. त्यामुळे हा सिनेमा घेण्यात आला आणि अमेझॉनला मोठा फटका बसला. ‘लक्ष्मी’, ‘दुर्गामती’ त्यानंतर ‘कुली नंबर वन’ असे सिनेमा दाखवल्याने अमेझॉनकडे प्रेक्षक पाठ फिरवू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता अमेझॉनने कुली नंबर वन का आणि कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आला याची अंतर्गत चौकशी सुरु केली आहे.

या सिनेमातील रेल्वेच्या टपावरून धावत जाऊन रुळावरील मुलाला वाचवण्याच्या वरुणच्या सीनची प्रचंड टेर उडवली जात आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी पूर्णपणे नाकारले. रुणपेक्षा गोविंदाचा अभिनय सरस होता असेच प्रेक्षकांचे म्हणणे होते. समीक्षक आणि प्रेक्षकांनी नाकारलेला हा सिनेमा आयएमडीबीच्या रेटिंगमध्ये सगळ्यात तळाला गेला आहे. याला दहा पैकी फक्त १.३ रेटिंग देण्यात आले. यापूर्वी सलमान खानच्या रेस ३ ला सगळ्यात कमी म्हणजेत १.७ रेटिंग मिळाले होते.

डेव्हिडने वरुणसाठी सलमान खान अभिनीत ‘जुडवा’चीही रिमेक केली होती. तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. पण ‘कुली नंबर वन’ची रिमेक बनवताना त्यात आजच्या काळानुसार त्यानं बदल केला नाही. त्यामुळेच एका हिट सिनेमाचा बट्याबोळ झाला आणि त्याचा फटका अमेझॉनला बसला असेच दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER