कुल गॉगल्स……

goggle

व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी गॉगल महत्त्वाचेच…अनेकजण विशिष्ट प्रसंगी आवडीने गॉगल वापरतात. पण काहींना गॉगल शोभतो तर काहींना नाही. मघ अश्यावेळेस प्रश्न पडतो की, नेमका कश्याप्रकारचा गॉगल आपल्याला शोभेल  त्यावेळी तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे तसेच चेहऱ्याच्या त्वचेनुसार योग्य रंगाचे फ्रेम असलेला गॉगल निवडावा.

  • ओव्हल फ्रेम गोल चेहऱ्यावर सूट करत नाही. स्क्वेअर चेहऱ्यासाठी राउंड फ्रेम असलेले गॉगल्स छान दिसतात. तसेच राउंड किंवा ओव्हल शेप चेहऱ्यासाठी स्क्वेअर शेप फ्रेम सूट करते.
  • मोठया फ्रेमचे गॉगल्स फॅशनमध्ये असले तरी आपण गॉगल्सचा आकार आपल्या चेहऱ्याप्रमाणे निवडावा. फॅशन म्हणून सामान्य चेहऱयावर मोठे गॉगल्स लावल्याने पूर्ण चेहरा झाकला जातो.
  • गॉगल्सच्या मधला भाग नाकावर येत असेल तर अशा गॉगल्समध्ये चेहरा लांब दिसतो. अशात गाल आणि डोळ्यांचा काही भाग दिसत असतो. अशी फ्रेम लहान चेहरा असणाऱ्यांसाठी योग्य असते. पण जर गॉगल्स लावल्यावर आपले नाक खेचले जात असेल तर हा आकार आपल्यासाठी योग्य नाही. आपण जरा मोठया आकाराचा गॉगल निवडायला हवा.

  • गॉगल्सच्या मधला भाग अगदी मधोमध असल्यास लांब चेहरा लहान दिसतो. त्यामुळे लांब चेहरा असणाऱ्यांना ही फ्रेम सूट करते.
  • फ्रेम निवडतांना शक्योतर हलका गोल्डन, काळा, ब्राउन रंगाची फ्रेम निवडावे. हे फ्रेम तुमच्या चेहऱ्यावर शोभून दिसेल. तसेच गडद निळी  फ्रेम चेहऱ्यावरील डाग लपवण्यात मदत करेल. लाल फ्रेम चंकी-फंकी असल्यामुळे नेहमी वापर करणे योग्य ठरणार नाही.
  • फ्रेम मेटल, नायलॉन, प्लास्टिक आणि टायटेनियम यापैकी कोणत्या वस्तूपासून बनवली आहे याची चौकशी करणे फार आवश्यक आहे. कारण प्रत्येक फ्रेमचे काही फायदे आणि तोटे आहेत. ज्या फ्रेमचे फायदे जास्त असाच चष्मा विकत घ्या.
  • स्वस्त गॉगल्स वापरू नये. नेहमी उत्तम क्वॉलिटीचे गॉगल्स खरेदी करा. आणि त्यातही टिंटेड सनग्लासेसचा वापर करा. यामुळे युवी किरणांपासून तुमच्या डोळ्यांचा रक्षण होईल.