‘धर्मांतरण’ हाच काँग्रेसचा मुख्य अजेंडा, तुषार भोसले यांचा गंभीर आरोप

Acharya Tushar Bhosale

मुंबई :- मोदी सरकारने (Modi Government) धर्मांतरण करणार्या अनेक संघटनांच्या मुसक्या आवळल्या आहेत पण राज्यात तीन बाटग्यांची सत्ता आहे. सत्तेसाठी लाचार शिवसेना (Shiv Sena) काँग्रेसच्या (Congress) दावणीला बांधली गेली आहे. त्यामुळे धर्मांतरण रोखणे हे काम आम्हाला करणे गरजेचे आहे. असे मत भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी व्यक्त केले. धर्मांतरण सुरु असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आदिवासी भागात जाऊन तुषार भोसले यांनी अटल-गीता जयंती साजरी केली. यावेळी ते बोलत होते.

यानिमित्ताने भजन, सामूहिक गीता पठण करुन थेट आदिवासी पाड्यांवर जाऊन १०० आदिवासी कुटुंबांना ‘गीता’ भेट देण्यात आली तसेच आपण हिंदु धर्मात जन्माला आलो आणि हिंदु म्हणुनच मरणार असा संकल्प देण्यात आला. यावेळी भाजपाचे व आध्यात्मिक समन्वय आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : शिवसेनाप्रमुखांना नमन करत भाई जगताप म्हणाले, स्वबळावर निवडणूक लढण्यास काँग्रेसची तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER