‘वंचित’तर्फे महिला अत्याचारविरोधी परिषदेचे आज आयोजन

VBA

औरंगाबाद : कोरेगाव भीमा शौर्यदिन प्रेरणा अभियान व वंचित बहुजन महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारी रोजी महिला अत्याचारविरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद दुपारी २ वाजता वासंती मंगल कार्यालय, बीड बायपास येथे होणार आहे.

परिषदेचे उद्घाटन अत्याचारपीडित महिलांच्या मुली, बहिणी व कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर तसेच अरुंधती सिरसाठ उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आघाडीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रेखा ठाकूर राहतील. सामाजिक कार्यकर्त्या फिरदोस फातेमा रमजानी खान, ओबीसी महिला आघाडीच्या सरस्वती हरकळ, अनिता पवार यांचीही उपस्थिती राहील, असे महिला आघाडीच्या अॅड. लता बामने, रवी गायकवाड यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.