मोर्चे थांबण्याच्या घोषणेचा वाद; ओबोसी नेत्यांचे समीर भुजबळांना आव्हान

Sameer Bhujbal

पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी यापुढे होणारे ओबीसी आंदोलन मोर्चे थांबणार असल्याची घोषणा काल औरंगाबादमध्ये केली. समीर यांच्या या घोषणेवर इतर ओबीसी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

‘समता परिषद म्हणजे ओबीसी समाज नव्हे, शिवाय भुजबळांचे आंदोलन हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे,’ असा आरोप इतर ओबीसी संघटनांनी केला. यापुढेही मोर्चे, आंदोलनं सुरूच राहणार असून २६ तारखेला नगरला ओबीसींचे जोरदार शक्ती प्रदर्शन होईल व त्यात काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवारही भागी घेतील, असे सांगण्यात आले.

या आंदोलनाच्या मुद्द्यावरून व्हीजेएनटीचे बाळासाहेब सानप आणि ओबीसी संघर्ष सेनेचे प्रा. लक्ष्मण हाके समीर भुजबळ यांच्या विरोधात उभे झाले आहेत.

समीर भुजबळ यांची घोषणा

‘आजच्या नंतर होणारे ओबीसी समाजाचे सर्व मोर्चे रद्द करण्यात येत आहेत. सरकारने ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लावण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चे रद्द करत आहोत. त्यामुळे औरंगाबादेतील आजचा मोर्चा सरकारचे आभार मानणारा मोर्चा आहे,’ अशी घोषणा समीर भुजबळ यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे केली होती.

दरम्यान, राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून नवा संघर्ष उभा राहिला आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पेच निर्माण झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, अशी मागणी काही संघटनांनी केल्यानंतर ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER