कोरोना लसीच्या पुरवठ्याचा वाद पेटला केंद्र आणि राज्याचे आरोग्यमंत्री आमने सामने

Maharashtra Today

राज्यात कोरोनाच्या (Corona)लाटेनं थैमान घातलंय. दवाखान्यांमध्ये बेड्स (Beds) मिळत नाहीयेत. नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय. राज्यात कोरोनामुळं इतकी नाजून परिस्थीती असताना केंद्र आणि राज्य सरकाराचे आरोग्य मंत्री एकमेकांना धारेवर धरतायेत. राजेश टोपेंनी (Rajesh Tope)कोरोना लसींचा तुटवडा पडत असल्याचं सांगितलं. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshavardhana) यांनी प्रसिद्धी पत्रातून त्यांना उत्तर दिलंय. “महाराष्ट्र सरकारच्या” ढिसाळ कारभारामुळं देशाला कोरोनाच्या संकाटाचा सामना कारवा लागतोय.” असं गंभीर विधान केलंय. (Controversy over supply of corona vaccine)फक्त रुग्ण वाढीत नाही तर

“महाराष्ट्र सरकारच्या चुकीचा देशाला फटका बसाला आहे”

महाराष्ट्र सरकार कोरोना संकटाबद्दल गंभीर नसल्याची टिका केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली. ते म्हणाले”कोरोना विषाणूशी लढत असताना महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या कारभाराचा आणि प्रासंगिक दृष्टीकोनाचा मी स्वत: साक्षीदार आहे. राज्य सरकारच्या अशा अभावांमुळेच संपूर्ण देशाच्या कोरोना विरुद्ध लढण्याच्या मोहिमेला फटका बसला आहे.”

यामुळं केंद्रविरुद्ध राज्य सरकार अशा नव्या वादाला तोंड फुटलंय. केद्रीय आरोग्यमंत्र्यांचे गंभीर आरोप जर खरे असतील तर राज्यातल्या कोरोना प्रसाराला महाविकास आघाडीला जबाबदार धरावं का? असा प्रश्न जनसामान्य आता विचारताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे कान टोचल्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारेवर धरलं. केंद्रानं राज्याला कोरोनाशी लढण्याबाबत सर्व प्रकराचं उपदेशन केलंय. संसाधनं उपलब्ध करुन दिलियेत. मदतीसाठी पथक पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व काही असताना महाराष्ट्र सरकार प्रयत्नांमध्ये कमी पडतंय.

मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर आणि कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्न चिन्ह निर्माण केलं. ते म्हणाले “आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठीही सरकारची कामगिरी चांगली नाही. सरकार वैयक्तिक वसुली करण्यासाठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमधून सवलत देत आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा धोका वाढत आहे, हे पाहणं धक्कादायक आहे. एकंदरीतच, राज्य एका संकाटातून दुसऱ्या संकटात अडकले आहे. राज्याचं नेतृत्व आनंदाने आराम करत असल्याचं दिसतं.”

महाराष्ट्रात कोरोना प्रसारामुळं गंभीर परिस्थीती निर्माण झालीये. यासाठी ट्रेसिंग आणि टेस्टींगवर जोर द्यावा असा सल्ला त्यांनी राज्य सरकार दिला, “आज महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यू आहेत. एवढेच नव्हे तर जगात सर्वाधिक चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही महाराष्ट्रातच आहे. याठिकाणी चाचणी योग्य पद्धतीने होत नसून कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे कामही होत नाही.” असं विधान त्यांनी राज्याच्या आरोग्य यंत्रणेबद्दल केलं.

फडणवीसांनी सुनावले खडे बोल

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केंद्राकडं बोट दाखवताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राजेश टोपे देत असलेली माहिती खोटी असल्याचा दावा केला. देशात सर्वाधिक लसींचा पुरवठा महाराष्ट्राला झाला असल्याचं ही फडणवीस म्हणाले.

केंद्राकडून लसींचा पुरवठा होतो आहे. मात्र त्यामध्ये वेग कमी आहे. असं विधानसुद्धा राजेश टोपे यांनी केलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. लसीकरणासंदर्भात राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून करण्यात येणारे आरोप चुकीचे आहेत. मंत्री चुकीची माहिती देत आहे. असे फडणवीस म्हणाले आहेत.

“केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधीक लसी दिल्या जात आहे. भारत सरकार काही वेगळं आहे का? आणि असे विषय राज्त सरकारमधील मत्र्यांनी केंद्र सरकारशी बोलले पाहिजे. माध्यमांशी नाही” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले माध्यमांशी बोलायचं आणि हात झटकायचं हे बंद झालं पाहिजे. अशी टीकासुद्धा फडणवीस यांनी यावेळी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button