काळाघोडा परिसरातील चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचे नाव का? काँग्रेस – शिवसेनेचा वाद सवाल चव्हाट्यावर

kala-ghoda-junction

मुंबई : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस आणि शिवसेनामधील (Shivsena) वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे . फोर्टमधील काळाघोडा परिसरातील (kala-ghoda-junction) चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. समजावादी पार्टीपाठोपाठ आता काँग्रेसनेही या नावाला विरोध केला आहे. मराठी नावांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेने या चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचे नाव देण्यास मंजुरी का दिली? असा सवालच काँग्रेसने शिवसेनेला विचारला आहे.

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काळाघोडा परिसरातील चौकाल इस्रायलचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरिस यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यावरून रवी राजा यांनी शिवसेनेला घेरलं आहे. पेरिस यांचं नाव या चौकाला देण्यासाठी 2018 रोजी प्रस्ताव देण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा प्रस्ताव आणला होता. काही दिवसातच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सभागृहातही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नंतर या चौकात इस्रायलच्या माजी पंतप्रधानांच्या नावाने पाटीही लागली. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ज्या व्यक्तीचं काहीही योगदान नसताना मुंबईतील चौकाला या व्यक्तीचं नाव का? असा सवाल रवी राजा यांनी केला आहे.

मूळ भारतीय नावांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचं नाव कसं चाललं? या नावाला शिवसेनेने मंजूरी का दिली? असा सवालही त्यांनी केला. महापालिकेच्या नियमावलीनुसार विदेशी व्यक्तीचे नाव रस्ते आणि चौकांना दिलं जाऊ शकत नाही. मग तरीही विदेशी व्यक्तीचं नाव या चौकाला का देण्यात आलं? असा सवाल विरोधक करत आहेत. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER