पुण्यात सोमवारपासून ‘नियंत्रित संचार’; शाळा व महाविद्यालांना बंधने

'Controlled communication' in Pune from Monday; Restrictions on schools and colleges

पुणे : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात सोमवारपासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार आहे. नियम लावले असले तरी, त्याला संचारबंदी न म्हणता ‘नियंत्रित संचार’ असे संबोधण्यात येणार.

आज कौन्सिल हॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना नियंत्रण आढावा बैठक घेतली. या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्ह्यात ‘नियंत्रित संचार’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांसाठी सूचनाही जारी केल्या आहेत.

सोबतच जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी, राजकीय कार्यक्रमांसह विवाह सोहळ्याला २०० लोकांची उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच विवाह सोहळ्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. हॉटेल, लॉज, बार रेस्टॉरंट रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार, तर अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत इतरांसाठी ‘नियंत्रित संचार’ बंदी लागू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER