स्टिल आणि सिमेंट अवाजवी वाढ नियंत्रित करा

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : सिमेंट आणि स्टील कंपन्याकडून सातत्याने कृत्रिम दरवाढ (steel and cement Artificial inflation growth)केली जात आहे. कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. याचा मोठा फटका बिल्डर तसेच ग्राहकांना बसत आहे. स्टिल आणि सिमेंट अवाजवी वाढ नियंत्रित करण्यासाठी सिमेंट-स्टील रेग्युलेटरी अथॉरिटी तयार करावी, अशी मागणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे (Bhau Galande) यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाव्दारे केली.

बीएआयने देशव्यापी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. तसेच बीएआयतर्फे राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कोरोनामुळे सहा महिने बांधकाम व्यवसाय ठप्प होता. दरम्यान, सिमेंट-स्टीलची मागणी खूपच घटली आहे. करात वाढ नाही. तरही सिमेंट आणि स्टीलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सिमेंट-स्टीलच्या कंपन्याची मक्तेदारी बंद झाल्याशिवाय घरांच्या किमती कमी होणार नाहीत. बांधकाम व्यावसायावर नियंत्रण आणण्यासाठी रेरा प्रमाणेच अथॉरिटी स्थापन करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी असो.चे अध्यक्ष सचिन पाटील, सोपान पाटील, रणजित पाटील, बापू कोंडेकर, उमेश शेठ, संग्रामसिंह निंबाळकर, राजेश डाके, मदन भंडारी,ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER