बॅटीत ‘चाॅईसच चाॅईस’ पण चेंडूत ‘नो चाॅईस’..! क्रिकेटप्रेमींचा सवाल..असे का?

Maharashtra Today

क्रिकेटच्या बॅटी (Cricket Bat). ह्या बांबूच्या (Bamboo) बनवलेल्या असतील तर त्या पारंपरिक लाकडी बॅटीपेक्षा किफायती आणि टणक असतील, त्यांचा स्वीट स्पॉट (Sweet Spot)मोठा असेल आणि त्यामुळे फलंदाजांना याॕर्करसुध्दा खेळणे सोपे जाईल असे संशोधन पुढे आले आहे. केंब्रिज (Cambridge university) विद्यापिठातील संशोधक दर्शिल शहा (Darshil Shah) व बेन टिंकलर डेव्हिस (Ben Tinkler Davies) यांनी हे संशोधन मांडले आहे पण जगभरातील क्रिकेटच्या नियमांचे (Cricket Rules) अधिकृत नियमन करणाऱ्या मेरिलेबोन क्रिकेट क्लब (MCC) ने बांबूची बॅट (Bamboo Bat) चालणार नसल्याचे स्पष्ट केले असून तशी बॕट वापरल्यास ते अवैध ठरेल असे म्हटले आहे.

सद्यस्थितीत नियम 5.3.2 नियमानुसार क्रिकेटच्या बॅटीचे पाते हे केवळ लाकडापासूनच बनलेले असावे. मात्र बांबू हे गवत आहे आणि गवताच्या बॅटी वापरण्यासाठी नियमांत बदल करावे लागतील. बांबूला लाकूड जरी मानले तरी नियमात बदल करावे लागतील कारण बॅटीच्या पात्याला लॕमिनेशन करायची परवानगी नाही आणि बांबूची बॅट वापरायची झाली तर लॕमिनेशन करावेच लागेल. सध्या ज्युनियर क्रिकेटच्या बॕटींनाच लॕमिनेशनची परवानगी आहे. त्यामुळे बांबूच्या बॕटी निकाली निघाल्या असल्या तरी यानिमित्ताने बॕटीबद्दल एका वेगळ्या चर्चेला तोंड फूटले आहे.

ही चर्चा अशी की, ज्याप्रकारे क्रिकेट सामन्यांसाठी चेंडू एकसारखाच असतो आणि तो ठरवण्याचा अधिकार आयोजकांनाच असतो, गोलंदाज किंवा संघांचा त्याच्यात काहीच रोल नसतो. प्रत्येक गोलंदाज त्याला हवा तसा वेगळा चेंडू वापरू शकत नाही. एकच चेंडू सर्व गोलंदाजांना वापरायचा असतो. तसेच बॅटीबद्दलही व्हायला हवे.

हल्ली प्रत्येक फलंदाजाची बॕटवेगळी असते. त्याचा ब्रँड वेगळा असतो. परिमाणांच्या नियमांत बसणारी असली तरी प्रत्येक बॅटीची डिझाईन वेगळी असते. वजन कमी जास्त असते. कुणाची बॕट जड तर कुणाची हलकी असते आणि त्याचा आपआपल्या परीने फलंदाजांना फायदा होत असतो. चेंडूत गोलंदाजांना काहीच चाॕईस नाही पण बॕटीत फलंदाजांना चाॅईसच चाॅईस हे योग्य नाही असा विचार पुढे आला आहे. त्यामुळे एकसारख्या चेंडूप्रमाणेच सामन्यांवेळी फलंदाजांना एकच प्रकारच्या, सारख्याच आकार व सारख्याच वजनाच्या बॕट दिल्या जाव्यात असा विचार पुढे आला आहे.

यासंदर्भात उदाहरणच द्यायचे तर वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लाॕईड हे त्यांच्याकाळात सर्वात वजनदार बॅटीने खेळण्यासाठी प्रसिध्द होते. त्यांची बॅट ही साधारण एक किलो 470 ग्रॅम वजनाची असायची.

इयान बोथम, क्लाईव्ह राईस यांचा तसाच लौकिक होता. सचिन तेंडूलकरची बॅटही वजनदार बॅटीतच गणली जायची. सचिनची एमआरएफ बॅट 1 किलो 470 ग्रॅम वजनाची असायची तर नंतर कुकाबुराची बॕट सव्वाकिलो वजनाची असायची. ख्रिस गेल व विरेंद्र सेहवाग हेसुध्दा जड बॕट वापरतात. मात्र अष्टपैलू लान्स क्लुसनर हात तर सर्वात जड बॕट वापरायचा. त्याच्या बॕटीचे वजन दीड किलोच्यावर म्हणजे एक किलो 530 ग्रॕम असायचे.

याच्या उलट न्यूझीलंडचा केन विल्यम्सन हा सर्वात हलक्या बॅटीने खेळतो. त्याची बॕट फक्त एक किलो 120 ग्रॕम वजनाची असते. एबीडी विलियर्सची बॅटसुध्दा हलकीच एक किलो 190 ग्रॕम असते. विराट कोहली व डेव्हिड वाॕर्नर यांची बॕटसुध्दा सव्वा किलोपेक्षा कमी वजनाची असते. याप्रकारे प्रत्येक फलंदाजाची बॕट वेगळी असते. चेंडू आणि फळीच्या या खेळात बॕट आणि बॉलबद्दल असा विरोधाभास असतो.

राहिला विषय एमसीसीला बॅटीचे पाते लाकडाचेच असावे याचा नियम का करावा लागला याचे तर 1979 मध्ये आॕस्ट्रेलियाचा डेनिस लिली अॕल्युमिनियमची बॅट घेऊन मैदानात उतरला होता. तेंव्हा हा नियम करणे भाग पडले होते. नंतर 2003 च्या विश्वचषक स्पर्धेवेळीसुध्दा रिकी पोंटिंगच्या बॅटीत स्प्रिंग असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर आता डेव्हिस व शहा यांच्या संशोधनाने बॅट चर्चेत आली आहे आणि त्यानिमित्ताने संतुलनाचा हा एक चांगला मुद्दा काही क्रिकेटप्रेमींनी मांडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button