मालाड इमारत दुर्घटनाप्रकरणी ठेकेदारास अटक!

Malad building accident case - Maharashtra Today

मुंबई :- गुरुवारी मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ११ जण दगावले. या दुर्घटनाप्रकरणी मालवणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. या दुर्घटनाप्रकरणी ठेकेदार रमजान शेख याला अटक केली आहे. तसेच इमारत मालक रफिक सिद्दीकी यालाही आरोपी करण्यात आले आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा मुलांसह नऊ जणांचा करुण अंत झाला आहे.

तर सात जण यात जखमी झाल्याचे समोर आले. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री ठाकरे (CM Thackeray) यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button