कोल्हापुरात पावसाची संततधार : राधानगरी धरणाचे तीन दरवाजे खुले

कोल्हापूर :  कोल्हापुरात (Kolhapur) गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाची (Rain) अजूनही संततधार कायम  आहे. गेल्या तीन दिवसांत धरण क्षेत्रात नागरी वस्तीच्या मानाने पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र बुधवारी रात्रभर राधानगरी धरण (Radhanagari dam) क्षेत्रात धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे सकाळी राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाले.

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने २० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणाचे आज दुपारी १२.३८ वाजता स्वयंचलित द्वार क्र. ६ खुले  झाले. तसेच द्वार क्र.  ३ सुद्धा १२.४८ वाजता उघडले. यानंतर दुपारी २ वाजता ४ क्रमांकाचा दरवाजा उघडला. सध्या राधानगरी धरणात ३४७ फूट पाणीपातळी आहे.

पंचगंगा नदीत ४२५६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पुढील १२ तासांत पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील गावांना प्रशासाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER