सुट्टी दिवशी बँका सुरु ठेवा – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली :जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर झालेल्या पाऊसामुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मदतीचे कार्य शासनस्तरावरुन करण्यात येत आहे.

याचबरोबर सर्व संबंधित पूर बाधितांना शासनस्तरावरुन मंजूर झालेली रक्कम वेळेत मिळणे आवश्यक आहे. तसेच बँकांच्या विविध शाखातील/ATM मधील रोख रक्कमेचा तुटवडा निर्माण झालेला आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, व पलूस तालुक्यातील भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक व सर्व राष्ट्रीयकृत बँक यांच्या सर्व शाखा हे नैसर्गिक आपत्तीचे कामकाज पूर्ण होईपर्यंत दररोज (सुट्टी दिवशीही) सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.