साखरेचा बफर स्टाॅक सुरू ठेवा : राजू शेटटी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्र

Raju Shetti - PM Narendra Modi

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेचा बफर स्टॉक सुरू ठेवावा, अशी विनंती करणारे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी(Raju Shetti) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan)यांना पाठवले.

शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत झोपेचे सोंग घेणार्या निती आयोगाने खडबडून जागे होत साखरेचा बफर स्टाॅक करू नये, अशी शिफारस केंद्र सरकारला केली आहे. २५ हजार कोटीपेक्षा जास्त ऊस उत्पादकांची देणी थकलेली आहेत. निती आयोगाचे ऐकुण सरकारने जर बफर स्टाॅक केला नाही, तर साखर उद्योग दिवाळखोरीत निघेल. पण देशातील ५ कोटी ऊस उत्पादक कुटूंबे,४० लाख कुशल ,अकुशल कामगार व ५२७ साखर कारखाने देशोधडीला लागतील, अशी भीती राजू शेट्टी यांनी उपस्थित केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER