विश्वचषक हॉकीसाठी आता काँटीनेंटल स्पर्धेतून मिळेल स्थान

International Hockey Federation - FIH

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) विश्वचषक स्पर्धेसाठी (World Cup Hockey) पारंपारिक पात्रता स्पर्धा रद्द केली आहे. पुरुष व महिला, दोन्ही गटात पात्रता स्पर्धेसाठी महासंघाने नवा फॉर्म्युला आणला आहे. महिलांची विश्वचषक स्पर्धा 2022 मध्ये तर पुरुषांची स्पर्धा 2023 मध्ये होणार आहे. त्यासाठीच्या पात्रता स्पर्धेतील बदलाबाबतचा निर्णय आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

या निर्णयानुसार आता पात्रता स्पर्धेऐवजी संघांचा विश्वचषक स्पर्धेतील प्रवेश 2021 च्या काँटीनेंटल स्पर्धेच्या (Continental Cup) कामगिरीआधारे होईल. आतापर्यंत या स्पर्धेच्या विजेत्यांना विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळत होता आणि इतर संघ पात्रता स्पर्धेतून स्थान मिळवत होते.

आता नव्या पध्दतीनुसार यजमानांसह आशिया खंडातून चार संघ आशिया कप 2021 मधील स्थानांनुसार पात्र ठरतील. युरोपातील सात संघ, पॅन अमेरिका व ओशियानिया गटातून प्रत्येकी दोन आणि आफ्रिकेतुन एक संघ 2023 च्या पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

विश्वचषक हॉकीसाठी संघांची संख्या 2018 मध्ये 12 वरुन 16 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यात पाच काँटीनेंटल विजेते व 11 संघ हॉकी वर्ल्ड लीगमधून येतील असे ठराले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER