रेमडेसिविरसाठी संपर्क साधा…; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर

NCP - BJP- Maharastra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे सनकोट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागल्यानं बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून राजकारणदेखील तापलं आहे. गुजरातमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात रेमडेसिविरचा मोठा साठा आढळून आला. भाजपकडून रेमडेसिविरची साठेबाजी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला. यानंतर आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं रेमडेसिविर औषधासाठी संपर्क करा असं आवाहन करत भाजपच्या नेत्याचा नंबर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसशी संबंधित एका कार्यकर्त्यानं पिंपरी चिंचवड शहरासाठीच्या फेसबुक पेजवर एक मोबाईल नंबर शेअर केला आहे. रेमडेसिविर औषध हवं असल्यास तात्काळ संपर्क साधा असं आवाहन या कार्यकर्त्यानं केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं शेअर केलेला मोबाईल नंबर पिंपरी चिंचवडचे भाजप नगरसेवक नामदेव ढाकेंचा आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं फेसबुक पोस्टमध्ये नंबर दिल्यामुळे गेल्या दोन दिवसांत ढाकेंना अनेकांनी फोन केले. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं ढाकेंचा नंबर आपणच फेसबुकवर पोस्ट .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button