ग्राहकांना दिलासा, रेस्टॉरंट्स आणि बार रात्री १० पर्यंत सुरू राहणार

Bar And Restaurant

मुंबई : राज्य सरकारने निशाण बिगेन अंतर्गत रेस्टॉरंट्स (Restaurant) आणि बार (Bar) उघडायला परवानगी दिली. मात्र त्यांच्या वेळा जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या. आज मात्र पर्यटन विभागाने याबाबत आदेश जारी केले आहे. आधी रेस्टॉरंट्स आणि बार उघडी ठेवण्यास सकाळी ८ ते सायंकाळ ७ अशी वेळ देण्यात आली होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. आता सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू राहणार आहेत.

रेस्टोर्ंट आणि बारच्या वेळा वाढवाव्यात अशी मागणी संबधित व्यवसायिक संघटनांची होती त्यानुसार सरकारने नवा आदेश काढला आहे. तसेच स्थानिक महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन याबाबत अंतिम निर्णय घ्यावा असंही राज्य सरकारने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER