
नवी दिल्ली : वस्तूंची विक्री मग ती एखाद्या कंपनीतून असो वा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून त्या वस्तूसंबंधीत सर्व माहिती त्या प्रॉडक्ट लेबलवर असणे अनिवार्य आहे. ते उत्पादन कोणत्या देशातील आहे, त्याचे वजन, किंमत, त्या वस्तुची मॅनुफॅक्चरिंग आणि एक्सपायरी तारीख हे त्या व्सतुच्या लेबलवर स्पष्ट लिहीलेले असावे असे निर्देश ग्राहक सेवा मंत्रालयाने दिले आहे.
यासोबतच, मॅनुफॅक्चरर म्हणजे उत्पादक, विक्रेता, ग्राहक संरक्षण विस्तृत माहिती वस्तुच्या लेबलवर असणे अत्यावश्यक आहे. तर ऑनलाईन वस्तू विकताना संबंधीत वेबसाईटने वस्तुसंबंधीत सर्व माहिती त्यांच्या वेबसाईटवर देणे आवश्यक आहे. अन्यथा 25000 हजारापर्यंतचा दंड पडू शकतो असे ग्राहक मंत्रालयाने सुचीत केले आहे.
ग्राहक अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, ग्राहक मंत्रालय इतर विभागाशीही या संबंधीत सुचना करण्याचे काम करत आहेत.
तसेच, आम्ही इ – कॉमर्स कंपनींना ,या संबंधी पत्र लिहील्याचेही पासवान म्हणाले. या पत्रातून सर्व कंपन्यांनी पॅकेज कमोडिटी नियमानुसार वस्तूंचे पॅकेजींग करावे मात्र, अद्यापही चायनाची कंपनी विवो भारतीय सरकारशी व संबंधीत वस्तू विक्रेते मालकांच्या संपर्कात आहे आणि यामुळे वस्तूंवरील लेबलिंग क्लिअरन्समध्ये अडथळा येत आहे असे दानिश खान यांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे.
परंतु, असे असले तरी, ग्राहकांना वस्तूंबाबत स्पष्ट माहिती देण्याच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत असून ते लवकरच तसा कायदाच अंमलात आणला जाईल असे पासवान म्हणाले.
पासवान म्हणाले, कंपन्यांनी त्यांच्या प्रत्येक वस्तुंवर एक्सपायरी तारीख स्पष्ट लिहावी अनेक कंपन्या बेस्ट बिफोर 6 महिने असा उल्लेख करतात असे न लिहीता स्पष्टपणे एक्सपायरी तारीख लिहावी अन्यथा यापूढे ते प्रॉडक्ट अवैध ठरविल्या जाईल असेही पासवान म्हणाले.
सरकार येत्या दोन आठवड्य़ात वस्तुंवरील माहितीच्या निकषांवर कठोर पालन करण्याबाबत अधिकृत रिपोर्ट सादर करणार असल्याचेही मंत्री पासवान यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला