कोरोनाकाळात संसद भवन निर्माण, गुन्हेगारी स्वरूपातील अपव्यय; राहुल गांधींची टीका

Maharashtra Today

दिल्ली :- केंद्र सरकारने दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या ‘सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रकल्पा’चा समावेश अत्यावश्यक सेवेत केला आहे. त्यामुळे दिल्लीतील निर्बंधांच्या कालावधीमध्येही हे बांधकाम सुरू राहणार (Construction of Parliament building during Corona period) आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर (PM Modi) टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट केले – “सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवे घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको.”,सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा अत्यावश्यक सेवेत समावेश केल्याच्या बातमीची लिंक शेअर करत, गेल्या आठड्यात काँग्रेसने “ही वास्तू म्हणजे तुमच्या निर्दयतेची साक्ष देणारी असेल हे लक्षात ठेवा,” असा टोमणा मोदींना मारला होता.

प्रकल्प

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनी या प्रकल्पाच्या भूमिपूजनासंदर्भात बोलताना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सविस्तर माहिती दिली होती. “नव्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे ८८८ जागा असतील तर राज्यसभा सदस्यांसाठी ३२६ पेक्षा अधिक. म्हणजेच नव्या संसद भवनात एकूण १,२२४ सदस्य एकाचवेळी बसू शकतील. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी आपण या नव्या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु करणार आहोत,” असे बिर्ला म्हणाले होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button