शहरात ३० ‘सीएनजी’ स्टेशनची निर्मिती

nashik

नाशिक : शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्यावतीने ‘सीएनजी’ व ‘पीएनजी’ भूमिगत गॅस पाईपलाईन प्रकल्पाचे काम सुरू आहे. जूनपर्यंत शहरात ३० ‘सीएनजी’ स्टेशनची निर्मिती पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर शहरातील ग्राहकांनी आतापर्यंत २५ हजार ‘पीएनजी’ घरगुती गॅस जोडणीबाबत नोंदणी केली आहे. त्यातील जवळपास २० हजार गॅस पाईपलाईन जोडणीची कामे पूर्ण झाली आहेत. अशी माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे प्रकल्प अधिकारी संदीप श्रीवास्तव यांनी दिली. या प्रकल्पाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेतला.

शहरात हायप्रेशर, मिडीयम प्रेशर व लो प्रेशर पाईप लाईनचे काम प्रगतिपथावर आहे. लवरकरच नागरिकांना घरगुती गॅस उपलब्ध होणार आहे. तसेच ‘सीएनजी’ स्टेशनच्या माध्यमातून फोरव्हीलर वाहनांना व बसेसला गॅस उपलब्ध होणार आहे. सोबतच औद्योगिक वापरासाठीदेखील गॅस उपलब्ध होणार आहे. या सर्व प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती भुजबळ यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे अभियंता आदित्य रामदासी यांच्याकडून घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER