चार शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट; आंदोलनस्थळी एकाला पकडले

दिल्ली : नव्या कृषी कायद्यांवरून (Agriculture Law) शेतकरी नेते आणि केंद्र सरकार (Center Govt) यांच्यातील चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. शेतकरी प्रजासत्ताकदिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढणार आहेत. ही रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. या संदर्भात एका आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने हत्येच्या कटाची कबुली दिली आहे.

शुक्रवारी रात्री शेतकऱ्यांनी चेहरा झाकलेल्या एका व्यक्तीला माध्यमांसमोर आणले. त्याने सांगितले की, चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालणार होते. त्याने सांगितले, २६ जानेवारी रोजी काढण्यात येणारी रॅली उधळून लावण्यासाठी चार नेत्यांची हत्या करण्याचा कट रचला होता. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हे केले जाणार होते. आमच्या टीममधील अर्धे लोक पोलिसांची वेशभूषा करून रॅलीत घुसणार होते. व्यासपीठावर उपस्थित राहणार असलेल्या चार नेत्यांचे फोटो आम्हाला देण्यात आले होते. ज्याने आम्हाला हे सांगितले तो पोलीस आहे, अशी खळबळजनक कबुली आरोपीने दिली.

कट
आरोपीने कटाचाही उलगडा केला. “आमचे दोन गट तयार केले होते. १९ जानेवारीपासून आंदोलनस्थळी आहोत. शेतकरी सोबत शस्त्र बाळगतात का यांची माहिती घेत आहोत. २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांना रोखण्यात येईल. त्यानंतरही शेतकरी थांबले नाहीत तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश होते. दुसरीकडे १० जणांचा एक गट आहे. हा गट शेतकऱ्यांच्या रॅलीत सहभागी होऊन पाठीमागून गोळीबार करणार होता. त्यामुळे निदर्शक घाबरून पांगतील व गोळीबार शेतकऱ्यांमधून होतो आहे, असे वाटले असते. व्यासपीठावर जे चार लोक असतील, त्यांना गोळ्या घालण्याचा कट आहे. त्यांचे फोटो देण्यात आलेले आहेत. ज्याने आम्हाला हे सांगितलं, तो पोलीस आहे, त्याचे नाव प्रदीप सिंह आहे. तो राई ठाण्यात आहे. नेहमी चेहरा झाकून भेटायला यायचा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER