हाथरसच्या निमित्ताने जातीय दंगली भडकवण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांचा दावा

Hathras case.jpg

लखनौ : हाथरस प्रकरणाच्या (Hathras case) निमित्ताने जातीय दंगली भडकवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा उत्तर प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. याबाबीकग्य माहितीत म्हटले आहे की – एक बनावट वेबसाइट रात्रभरात तयार करण्यात आली आणि त्याद्वारे जातीय दंगली घडवण्याचा कट रचला गेला.

justiceforhathrasvictim.cardd.co ही ती वेबसाइट आहे. या वेबसाइटवर हाथरस प्रकरणानंतर हिंसाचाराची आग भडकवण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पीडितांना मदत देण्याच्या नावाखाली हिंसाचार पसरवण्यासाठी निधी उभारला जातो आहे. PFI, SDPI यासारख्या संघटनांनीही उत्तर प्रदेशात हिंसाचार पसरविण्यासाठी वेबसाइट तयार करण्यात भाग घेतला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल हा राज्य सरकारविरोधात कट आहे असे म्हणाले होते. ज्यांना विकास आवडत नाही, त्यांना जातीय हिंसा भडकवायची आहे त्यांना दंगलीच्या नावाखाली राजकारण करण्याची संधी मिळाली आहे. ते नवे कट रचत राहतात असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER