मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं षड्यंत्र, कट रचणारे रडारवर – परमबीर सिंग

Parambir Singh

मुंबई : सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणी आम्ही केलेली चौकशी एकदम योगय होती. एम्सनेही सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल सीबीआयकडे (CBI) सुपूर्द केला आहे. त्यामुळे आम्हाला त्यात काही आश्चर्य वाटलं नाही. मुंबई पोलिसांविरोधात (Mumbai Police) एक मोहीम चालवली गेली. मात्र, एम्सच्या (AIIMS) अहवालामुळे सत्य समोर आलं. सोशल मीडियावर एक फेक अकाऊंट बनवून पोलिसांविरोधातील बदनामीची मोहीम चालवली गेली. त्याची चौकशी सुरू असल्याचं सांगतानाच काही मीडियानेही मुंबई पोलिसांविरोधात मोहीम सुरू केली होती, असा आरोपही त्यांनी केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर चौफेर टीका झाली होती. सोशल मीडियावरूनही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. त्या सगळ्यांवर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मोठा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी मोठा कट रचण्यात आला. त्याच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलीस तपास करत आहे. पोलिसांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला.

सिंग म्हणाले, मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं. या षडयंत्रामागे कोण आहेत याचा तपास केला जात आहे. आम्ही मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केले होता आणि ते समाधानी होते. सत्य हे कायम सत्यच असते ते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक फेक अकाउंटस तयार केले गेले त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्व अकाउंटसचा तपास सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER