शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या हत्येचा कट, पोलिसात तक्रार दाखल

Sanjay Jadhav

परभणी : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आली असल्याची तक्रार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. नानलपेठ पोलीस ठाण्यात संजय जाधव यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली असून दोन कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचा दावा केला आहे.

आपली हत्या करण्यासाठी नांदेडमधील रिदा गँगला दोन कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचं खासदार संजय जाधव यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. परभरणीमधील एका मोठ्या व्यक्तीकडून ही सुपारी देण्यात आली असल्याचं संजय जाधव यांचं म्हणणं आहे. संजय जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी समिती नेमण्यात आली असून संपूर्ण माहिती घेतल्यानंरच गुन्हा दाखल केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER