
दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनालातील ४ नेत्यांची हत्त्या करण्याचा कट आखण्यात आला होता, असा दावा अप्रत्यक्षपणे शेतकरी नेत्यांकडून करण्यात आला होता. आता त्या कथित शूटरचा एक व्हीडीयो व्हायरल झाला असून त्यात त्याने, शेतकऱ्यांनी पढ पडवल्याप्रमाणे मी बोललो, असे म्हटल्याने प्रचंड खळबळ उडाली असून शेतकऱ्यांच्या विश्वसनीयतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा धोका आहे.
आता त्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. पकडण्यात आलेल्या युवकाचे नाव योगेश आहे. शेतकऱ्यांनी जे पढवले तेच मी बोललो, असे म्हणतो. हा व्हिडीओ अधिकृत असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.
या तरुणाला सोनीपत पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्याने काल प्रसिद्धी माध्यमांसमोर दिलेल्या वक्तव्याची व त्याच्या आजच्या व्हीडीओ आणि त्यातील माहितीची तपासणी सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला