भाजप नेत्यांच्या मनात काहीतरी कट-कारस्थान दिसत आहे; ‘उनसे ये उमीद नही थी’ – सुप्रिया सुळे

Supriya Sule

पुणे : राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे ,सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपा मंत्र्यांकडून वारंवार हे सरकार पडेल असे बोलले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडीचे सरकार अंतर्गत वादातून पडेल आणि महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असे भाकीत केले होते. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिय़ा दिली आहे.

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजप नेत्यांच्या मनात काहीतरी कट-कारस्थान दिसत आहे ही बाब दुर्दैवी आहे. एखादं सरकार ज्यावेळी निवडून येते. ते पाच वर्षासाठी काम करते, आम्ही अनेक वेळा विरोधात बसलो होतो. मात्र, सरकार पाडण्याचे उद्योग आणि महाराष्ट्राच्या जनतेला अडचणीत टाकून पुन्हा निवडणूक खर्च करण्याचे उद्योग आम्ही केले नाही अशी पापाची कामे आम्ही कधी करणारही नाही.

सध्या जे विरोधात बसलेले आहे त्यांना सत्तेशिवाय रहाणं अडचणीचं होत असल्याचं दिसतं आहे. काहीही करून सत्ता आणायची आणि वेळ पडली तर महाराष्ट्राच्या जनतेला अडचणीत आणायचे, निवडणुका घ्यायच्या व काहीही करून सत्येत कसे यायचे हेच प्रयत्न त्यांचे दिसत आहेत. त्यामुळे ही बाब दुर्देवाची आहे ‘उनसे ये उमीद नही थी’ असे म्हणत भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.