शिवसेनेला दिलासा : खेडच्या सभापतींवरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाची स्थगिती

Shivsena

राजगुरुनगर : खेड पंचायत समितीमध्ये सेना, भाजप व काँग्रेसचे मिळून १४ पैकी १० सदस्यांचे बहुमत आहे. शिवसेना व सहकारी पक्षांच्या सदस्यांमध्ये आपसात ठरल्यानुसार राजीनामा दिला नाही. म्हणून सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड करून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र आता पोखरकरांवरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने या ठरावाला स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती याचिकाकर्ते खेड पंचायत समितीचे काँग्रेसचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य अमोल पवार यांनी दिली.

शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे सभापती पोखरकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाल्याचे ३१ मे रोजी खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घोषित केले होते. सदस्यांमध्ये आपसात ठरल्याप्रमाणे सर्वांना संधी मिळाली पाहिजे असा दावा इच्छुकांनी बोलून दाखवला असून त्यासाठी हा अविश्वास दाखल केला होता. त्या निर्णयाला आव्हान देत सभापती पोखरकर, पंचायत समिती सदस्य कॉंग्रेसचे अमोल पवार व शिवसेनेच्या ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अविश्वास ठराव मंजुरीला स्थगिती दिली व पुढील सुनावणी २६ जून रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button