महाराष्ट्राला दिलासा, आज राज्यात कोरोनाबाधित आणि मृत्युसंख्येत मोठी घट

Rajesh Tope Corona

मुंबई : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसताना दिसला होता. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

राज्यात आज १०,२१९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज २२,०८१ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५५,६४,३४८ इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट ९५.२५ टक्के झाला आहे. आज १५४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण १,७४,३२० सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात १२,४७,०३३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,३२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. राज्यातील एकूण ३० जिल्हे आणि महानगरपालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २८, कोल्हापूरमध्ये २७, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात १४, अहमदनगरमध्ये ११ तर सोलापूरमध्ये १० मृत्यूंची नोंद झाली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button