महाराष्ट्राला दिलासा! कोरोना रुग्णांची संख्या घटतेय; आरती आहुजांची माहिती

Maharashtra Coronavirus Cases - Aarti Ahuja

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन कोरोनाने निर्माण झालेल्या राज्यनिहाय स्थितीची माहिती दिली. देशातील १२ राज्यांमध्ये एक लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सात  राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा (Aarti Ahuja) यांनी दिली.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तरप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि बिहारमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पण आता या राज्यांमध्ये हळू हळू कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. ५ ते १५ टक्के पॉझिटिव्हिटी दर हा नऊ  राज्यांमध्ये आहे. तर ५ टक्क्यांहून कमी पॉझिटिव्हिटी दर हा तीन  राज्यांमध्ये आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

दरम्यान, देशात १८ ते ४४ वर्षांवरील लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ११.८१ लाख नागरिकांना पहिला डोस दिला आहे. तर देशात एकूण १६.५० कोटी नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती आहुजा यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button