शेतकऱ्यांना दिलासा : १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याची शक्यता

Monsoon - Maharashtra Today

मुंबई :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. भारतात यंदा मान्सूनचे आगमन वेळेनुसार होणार आहे. १ जून रोजी मान्सून केरळमध्ये, १० जूनला तळकोकणात तर, १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र (Maharashtra) व्यापण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन राजीवन (Dr. Madhavan Rajivan) यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, येत्या १५  आणि ३१ मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या दोन वर्षांत अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button