सहकारी संस्थांना दिलासा : लेखापरिक्षणासह वार्षीक सभांस मुदतवाढ

Study

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने करोनामुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी ३१ मार्च२०२१पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लेखापरिक्षण करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत ही मुदत देण्यात आली. यामुळे सहकारी संस्थाना दिलासा मिळणार आहे. सर्वसाधारण सभा झाल्याशिवाय सभासदांना डिव्हीडंड वाटप करता येत नाही.

सहकारी संस्थांना निवडणूक, वार्षिक सर्वसाधारण सभा, लेखापरिक्षण तसेच पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ याबाबतीत कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत होता. राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कायद्याप्रमाणे ३० सप्टेंबर २०२० पर्यंत घेणे शक्य नाही. यामुळे संस्थांमधील सभासद अक्रियाशील होवून भविष्यात संस्थेच्या होणाऱ्या निवडणूकीत मतदार यादीतून वगळले जावून, मतदानापासून वंचित राहू शकतात.

ही बाब टाळण्यासाठी कलम २७ मध्ये सुधारणा करण्यात आली. तसेच वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून चार महिन्यांच्या कालावधीत लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या करोनाच्या उद्रेकामुळे दिलेल्या मुदतीत लेखापरिक्षण अहवाल सादर करणे शक्य नसल्याने लेखापरिक्षण अहवाल ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सादर करण्याच्या कालावधीत वाढ करण्यासाठी कलम ८१ मध्ये कलमात सुधारणा करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER